मुहूर्त ट्रेडींग म्हणजे काय ? मराठी मधून | Muhurat Trading in Marathi

जानुन घेऊया मुहूर्त ट्रेडींग म्हणजे काय मराठी मधून | Muhurat Trading in Marathi

मित्रांनो दिवाळी म्हटलं कि दिवे, फटाके,सजावट, करंजी ,चकली आणि बरंच काही.

भारतीय  संस्कृतीप्रमाणे दिवाळी  म्हणजेच  लक्ष्मी पूजन दिवशी  आपल्या घरी सोनपावलांनी येणारी लक्ष्मी आणि धनलाभ होय.

शेअर बाजार आणि व्यापारी वर्गासाठी तर हा  दिवस अतिशय उत्साहाचा आणि चैतन्याचा दिवस होय.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर बाजाराला दिवसभर सुट्टी असते तर काही वेळे पुरते  ट्रेडींग सेशन आयोजित केलेले असते.याच ट्रेडींग सेशनलाच मुहूर्त ट्रेडिंग असे म्हणतात. 

शेअर मार्केट मधील ट्रेडिंग चे प्रकार.( Types of trading in Stock market in Marathi )

ह्या लेखात आपण जानुन घेणार आहोत खालील गोष्टी.. 

  1. मुहूर्त ट्रेडींग म्हणजे काय ? | What is Muhurat Trading? 
  2. मुहूर्त ट्रेडींगचा इतिहास | History of Muhurat Trading 
  3. मुहूर्त ट्रेडींगचे महत्व | Importance of Muhurat Trading
  4. मुहूर्त ट्रेडींगची वेळ मुहूर्त ट्रेडींगची वेळ २०२३  | Muhurat Trading Timings 2023  
  5. मुहूर्त ट्रेडींगसाठी स्टॉक कसे निवडावे ? | How to Select Stocks for Muhurat Trading
  6. विक्रम संवत 2080 ची सुरुवात | Vikram Sanhita 2080


जानुन घेऊया मुहूर्त ट्रेडींग म्हणजे काय मराठी मधून
मुहूर्त ट्रेडींग

मुहूर्त ट्रेडींग म्हणजे काय ? | What is Muhurat Trading?

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर बाजाराला दिवसभर सुट्टी असते तर काही वेळे पुरते  ट्रेडींग सेशन आयोजित केलेले असते.याच ट्रेडींग सेशनलाच मुहूर्त ट्रेडिंग असे म्हणतात. 

मुहूर्त ट्रेडींगचा इतिहास | History of Muhurat Trading

मुहूर्त ट्रेडींग शेअर मार्केटमधे  ५० वर्षापासून चालत आलेली  परंपरा आहे.

मुहूर्त ट्रेडींगची हि पद्धत गुजराथी  लोकानी  शेअर बाजारात रुजू केली  आहे, असे मानले जाते.

पूर्वीच्या काळी जेव्हा स्क्रीनसमोर बसून ट्रेडींग केले जात न्हवते.  तेव्हा गुंतवणूकदार स्टॉक एक्सचेन्ज मध्ये  जमा होत होते व  गुंतवणूक करून नवीन वर्षाचे स्वागत करत असत .

मुहूर्त ट्रेडिंगची सुरुवात ही १९५७ पासून बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जमधुन सुरवात  झाली.( at the Bombay Stock Exchange (BSE) in 1957

मुहूर्त ट्रेडींगचे महत्व | Importance of Muhurat Trading

अनेक गुंतवणूकदारांचा  असा विश्वास आहे की मुहूर्ताच्या वेळी, ग्रह-तारे अशा प्रकारे एकत्र येतात की या काळात होणारे ट्रेंड  किंवा इतर कोणतेही कार्य निगेटीव शक्तींच्या प्रभावापासून मुक्त असते आणि या काळात जो कोणी बाजारात गुंतवणूक करतो त्याला भरपूर लाभ होण्याची शक्यता असते.

असे मानले जाते की मुहूर्त ट्रेडींग मध्ये गुंतवणूक केल्या मुळे आपल्याला वर्षभराच्या समृद्धी आणि संपत्तीचा ठेवा देऊन जाते.

या दिवशी ट्रेडींग केल्याने संपत्तीची देवता माता लक्ष्मी आपल्यावर  प्रसन्न होते आणि आपली भरभराट होते. अशी शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या लोकांची मान्यता आहे.

मुहूर्त ट्रेडींग दरम्यान व्हॉल्यूम कमी जरी असाल तरी देखील मार्केट एका चांगल्या स्तरावर क्लोझ झाल्याचा आजवरचा इतिहास आहे.

मुहूर्त ट्रेडींगमुळे बाजारात एक नवचैतन्य, उत्साह, आणि आनंद येण्याला मदत होते.

मुहूर्त ट्रेडींगची वेळ | Muhurat Trading Timings 2023  

सामान्य शेअर मार्केटमध्ये सकाळी ९:०० ते दुपारी ३:३० या काळातच ट्रेडींग करता येत. मात्र लक्ष्मी पूजनाच्या दिवशी  मुहूर्त ट्रेडींग हिन्दू पंचांगाप्रमाणे काढलेल्या मुहूर्त काळात पार पडते.

सर्वसाधारण पणे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी १  तास शेअर मार्केट ट्रेडींगसाठी खुले असते आणि हा एक तास संध्याकाळच्या मुहूर्तानुसार असतो.

सुरवातीची १५ मिनिटे हे  ब्लॉक डिल सेशन चे असतात  त्यानंतरची ७-८ मिनिटे मार्केट प्री-ओपन सेशन असते.

भारतीय शेअर बाजाराचा परिचय (Introduction to the Indian Stock Market)

मुहूर्त ट्रेडींगची वेळ २०२३ | Muhurat Trading Timings 2023

या वर्षीच्या दिवाळीपासून हिंदू कॅलेंडर वर्षानुसार संवत २०८० चे आगमन होणार आहे.

या वर्षी मुहूर्त ट्रेडिंग १२  नोव्हेंबर २०२३  रोजी सायंकाळी ६:००  ते ७:१५ दरम्यान पार पडणार आहे.

पहिले १५ मिनिट हे ब्लॉक डील सेशन संध्याकाळी ५: ४५ ते संध्याकाळी ६:०० पर्यंत चालणार आहे.

मार्केट प्री-ओपन सेशन हे संध्याकाळी ६:०० ते ६:०८ दरम्यान पार पडणाते.

त्यानंतर संध्या ७:१५ पर्यंत ट्रेडींग चालू राहते.

मार्केट क्लोझिंग सेशन हे संध्या ७:२५ ते संध्या ७:३५ दरम्यान पार पडते.

अधिक माहिती आपण एन.एस.इ. च्या वेबसाइटला भेट देऊन घेऊ शकता .

मुहूर्त ट्रेडींगसाठी स्टॉक कसे निवडावे ? | How to Select Stocks for Muhurat Trading

ह्या  साठी फंडामेंटली स्ट्रॉंग असे स्टॉक निवडले जातात.

या कालावधीत चांगले  स्टॉक्स खरेदी केल्यास चांगला परतावा मिळेलच असे नाही.

जरी दिवाळीच्या दिवशी एखाद्या स्टॉकने चांगली कामगिरी केली तरी भविष्यात त्याची कामगिरी त्याच्या आर्थिक घटकांवर अवलंबून असेल हे लक्षात असू द्या आणि चांगला अभ्यास करूनच  गुंतवणूक करा.

या काळात बरेच जन  गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार करत असल्याने आपण स्टॉक नाहीतर एक उद्योग विकत घेत असल्याचा विचार करून स्टॉक निवडावा असे तज्ञाचे मत आहे.

स्टॉक निवडण्या साठी स्टॉकच्या काही खालील गोष्टींचा विचार जरूर करा आणि मगच गुंतवनुक .

  1. कंपनीचे व्यवस्थापन ( Management )

  2. कंपनीचे बिझनेस मॉडेल( Business Model )

  3. कंपनीचे इतर स्पर्धक (Competitors )

  4. कंपनी काम करत असलेल्या क्षेत्राला असणारा वाव ( Scope of Sector )

  5. कंपनीचे मागील काही वर्षातील आर्थिक कामकाज, नफा, तोटा, महसूल इ.( Back history , Profit / Loss ) 

विक्रम संवत 2080 ची सुरुवात | Vikram Sanhita 2080

मित्रांनो वर्षी विक्रम संवत 2080 ची सुरुवात ह्या मुहूर्ताच्या व्यवहाराने होणार आहे. या मुहूर्तात व्यवहार बाजार मजबूत राहील, असा अंदाज बाजार विश्लेषकानी  व्यक्त केला आहे. गेल्या काही वर्षांत ह्या वेळी बाजारात चांगली वाढ झालेली  आहे. काही वर्षे  वगळता, बहुतेक वेळा ह्या  व्यवहारा दरम्यान बाजार हिरव्या चिन्हावर बंद झाला आहे. गेल्या 10 पैकी 7  मुहूर्त ट्रेडिंग मध्ये  बाजार तेजी दिसून आली. तर, तीन वेळेस बाजारात लाल रंग दिसला आहे.

मित्रांनो, अशा प्रकारे आपण या लेखात आपण मुहूर्त ट्रेडींग विषयी माहिती घेतली.

या लेखात अजून जास्त माहिती वाढवण्याची आमची टीम  प्रयत्न करेल.

आपण आपला किमती वेळ देऊन हा लेख वाचला त्याबद्दल आम्ही आभारी आहे.

आपल्याला दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा !!!

हे देखील वाचा : - 

शेअर मार्केट मधील ट्रेडिंग चे प्रकार.( Types of trading in Stock market in Marathi )

भारतीय शेअर बाजाराचा परिचय (Introduction to the Indian Stock Market)

भारतीय शेअर बाजाराचा परिचय (Introduction to the Indian Stock Market)

( महत्त्वाचे सूचना हे आर्टिकल पूर्णतः शैक्षणिक उद्देशाने बनवले असून शेअर बाजारात गुंतवणूक करण्या अगोदर आपल्या आर्थिक सल्लागाराशी नक्कीच संपर्क साधा ह्या आर्टिकल वर अवलंबून राहून तुमचे कोणतेही नुकसान झाल्यास आम्ही जबाबदार नाही. )

Tags : diwali,Diwali 2023,Muhurat Trading, Sensex,Share Market,Stock Market,शेअर बाजार, शेअर मार्केट, सेन्सेक्स, निफ्टी, निफ्टी 50, मुहूर्त ट्रेडिंग

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.