शेअर मार्केट मधील ट्रेडिंग चे प्रकार.( Types of trading in Stock market in Marathi )

शेअर मार्केट मधील ट्रेडिंग चे प्रकार.
( Types of trading in Stock market in Marathi )

मित्रांनो स्टॉक मार्केट बद्दल ह्या आर्टिकल मध्ये आपण जाणून घेणार आहोत, शेअर मार्केटमध्ये आपण  कोणत्या प्रकारे पैसे कमवू शकतो ?( Share market basic knowledge in Marathi) .स्टॉक मार्केट म्हणजे कोणती पैशाची  विहीर अथवा समुद्र नसून इथे कोणीही कसेही  येऊन पैसे कमवू शकत नाही. त्यासाठी व्यवस्थित अभ्यास,संयम, सातत्याचा त्याचबरोबर प्रदीर्घ अनुभवाची गरज असते.  प्रस्तुत लेखांमध्ये आपण ट्रेडिंग चे प्रकार (टाइप्स ऑफ ट्रेडिंग इन मराठी ) जाणून घेणार आहोत. तर संपूर्ण आर्टिकल एकदा वाचून पहा काही समजले नसल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा व आवडल्यास आपल्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा  आमची टीम तुम्हाला अगदी थोडक्यातच जास्त  भारतीय शेअर मार्केट बद्दल मराठीतून माहिती देण्याचा प्रयत्न करेल.

जानुन घेऊया मुहूर्त ट्रेडींग म्हणजे काय मराठी मधून | Muhurat Trading in Marathi

  1. इंट्राडे ट्रेडिंग / डे ट्रेडिंग (Intraday Trading
  2. स्कॅल्पिंग ट्रेडिंग (Scalping Trading)
  3. स्विंग ट्रेडिंग (Swing Trading) 
  4. पोझिशन ट्रेडिंग (Position Trading) 
  5. मोमेंटम ट्रेडिंग (Momentum Trading)

तर ह्या पाच प्रकारे आपण स्टॉक मार्केटमध्ये पहिलं पाऊल टाकू शकतो तर चला तर मग आता आपण, प्रत्येक प्रकाराची थोडक्यात माहिती जाणून घेऊया.

शेअर मार्केट मधील ट्रेडिंग चे प्रकार

शेअर मार्केट मधील ट्रेडिंग चे प्रकार.( Types of trading in Stock market in Marathi  )


 A)  इंट्राडे ट्रेडिंग / डे ट्रेडिंग (Intraday Trading) 

इंट्राडे ट्रेडिंग किंवा याला डे ट्रेडिंग ( Day Trading)  असे देखील म्हणतात. या प्रकाराच्या ट्रेडिंग मध्ये कोणत्याही कंपनीचा स्टॉक एकाच दिवशी म्हणजेच सकाळी 9:15  ते दुपारी 3:30 पर्यंत  मध्ये म्हणजेच मार्केट खुले असेपर्यंत आपण खरेदी किंवा विक्री करू शकतो. लक्षात ठेवा आपल्याला खरेदी किंवा केलेला स्टॉक त्याच दिवशी विकावा लागतो, जर आपण नाही विकला तर मार्केटमधून ऑटोमॅटिकली तो स्टॉक विकला जातो. 

इंट्राडे ट्रेडिंग हे ट्रेडिंग मधील सर्वात अवघड पद्धत समजली जाते कारण यामध्ये आपल्याला टेक्निकल आनेलिसिस त्याचबरोबर न्यूज ,कंपनी बद्दलचे अपडेट याबद्दलची माहिती ठेवावी लागते .  

इंट्राडे ट्रेडिंग मध्ये आपल्याला ब्रोकर कडून ट्रेडिंग करण्यासाठी मार्जिन देखील दिले जाते. 

या प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये चांगला अनुभव, संयम, मानसिकता हे महत्त्वाचे असते त्यामुळे नवीन व्यक्तींनी ट्रेडिंगमध्ये पहिले पाऊल टाकताना इंट्राडे म्हणजेच डे ट्रेडिंग करू नये. 


B) स्कॅल्पिंग ट्रेडिंग (Scalping Trading) 

स्कॉल्पिंग ट्रेडिंग हा देखील इंट्राडे ट्रेडिंग मधीलच एक प्रकार आहे. यामध्ये काही सेकंदामध्येच  किंवा जास्तीत जास्त एक मिनिटाच्या आत स्टॉक खरेदी करून विक्री केली जाते. या प्रकारामध्ये वारंवार नफा कमवणे समाविष्ट असते. अशा प्रकारच्या ट्रेडिंगला ट्रेडरला इंट्राडे मधील प्रदीर्घ अनुभवाची गरज असते त्याचबरोबर वेळेचे नियोजन,  टेक्निकल अनालिसिस व कौशल्य अतिशय महत्त्वाचे आहे. अशा प्रकारचे ट्रेडिंग निफ्टी व बँक निफ्टी मध्ये जास्त प्रमाणात केले जाते, सध्याच्या काळात काही ट्रेडर लाखो रुपये या प्रकाराच्या ट्रेडिंग मधून कमवत आहेत. 

C)  स्विंग ट्रेडिंग (Swing Trading) 

स्विंग ट्रेडिंग  हा प्रकार नवीन ट्रेडर्स साठी चांगला मानला जातो. यामध्ये गुंतवणुकीतदारांना कमीत कमी एक ते जास्तीत जास्त सात दिवसासाठी एखाद्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करावी लागते.यामध्ये जास्तीत जास्त पाच ते सहा टक्के रिटर्न्स आल्यानंतर स्टॉक मधून एक्झिट केले जाते व थोडक्यात प्रॉफिट बुक केले जाते.  यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे मार्जिन भेटत नाही, त्याचबरोबर यामध्ये नुकसान होण्याची शक्यता कमी असते पार्ट टाइम साठी स्विंग ट्रेडिंग हे अत्यंत उपयुक्त त्याचे व फायदेशीर ठरते.


D) पोझिशन ट्रेडिंग (Position Trading) 

पोझिशन ट्रेडिंग मध्ये आपण एखादा स्टॉक कमीत कमी एक ते तीन महिने व जास्तीत जास्त सहा महिन्यापर्यंत खरेदी करून ठेवू शकतो. अशा प्रकारच्या ट्रेडिंगला शॉर्ट टर्म ट्रेडिंग असे देखील म्हणतात त्याचबरोबर अशा प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे फारच कमी असते. यामध्ये आपल्याला स्टॉक बद्दल फंडामेंटल अनालिसिस करणे व कंपनीचे भविष्यातील ध्येय लक्षात ठेवून त्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करावी लागते. यामध्ये दीर्घ काळ इन्वेस्टमेंट केल्यामुळे मोठ्या प्रमाणात नफा कमवता येतो. जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पहिल्यांदाच पैसे टाकणार असाल तर पोजिशनल ट्रेडिंग हे सर्वात सुरक्षित पद्धत आहे यामध्ये फक्त तुम्हाला चांगल्या कंपनीचे स्टॉक निवडणे आले पाहिजे.


E) मोमेंटम ट्रेडिंग (Momentum Trading)

ही एक प्रकारचे ब्रेक आउट किंवा ब्रेक डाऊन देणाऱ्या स्टॉक मध्ये ट्रेड करायची पद्धत आहे. यामध्ये एखादा गुंतवणूकदार असा स्टॉक ओळखतो की जो ब्रेक आउट देणार आहे किंवा ब्रेक डाऊन देणार आहे.  अशा स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट केले जाते या प्रकारचे ट्रेडिंग शॉर्ट साठी देखील असू शकते, किंवा इंट्राडे साठी देखील असू शकते.  

निफ्टी किंवा बँक निफ्टी मध्ये जेव्हा  एखादी न्यूज आल्यानंतर अचानक प्राईस वाढते किंवा कमी होते, अशा वेळेस त्यामध्ये ट्रेड केले जाते  प्रकारच्या ट्रेडिंगला मोमेंट ट्रेडिंग असे म्हणतात यामध्ये काही तासांमध्ये किंवा मिनिटा मध्येच खूप मोठ्या प्रमाणात मुव्हमेंट झालेली दिसून येते त्यामुळे ह्या प्रकारच्या ट्रेडिंग मध्ये जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते. 


तरी या काही प्रकारे आपण स्टॉक मार्केट मधून पैसे कमवू शकतो, वरील कोणत्याही प्रकारे आपल्याला सुरुवात करायची असल्यास तुम्हाला शेअर मार्केट बद्दल अभ्यास करूनच सुरुवात करावी लागेल. 

तर मग धन्यवाद मित्रांनो लेख कसा वाटला  हे नक्कीच कमेंट करून सांगा. त्याचबरोबर शेअर मार्केट शिकणाऱ्या तुमच्या सर्व मित्रांना पर्यंत हा लेख  पोहोचवा.

  अशाच प्रकारे स्टॉक मार्केट व  वरती अपडेट मिळवण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला देखील फॉलो करा. 

( महत्त्वाचे सूचना हे आर्टिकल पूर्णतः शैक्षणिक उद्देशाने बनवले असून शेअर बाजारात गुंतवणूक करण्या अगोदर आपल्या आर्थिक सल्लागाराशी नक्कीच संपर्क साधा ह्या आर्टिकल वर अवलंबून राहून तुमचे कोणतेही नुकसान झाल्यास आम्ही जबाबदार नाही. )

हे देखील वाचा : - 

शेअर मार्केट मधील ट्रेडिंग चे प्रकार.( Types of trading in Stock market in Marathi )

भारतीय शेअर बाजाराचा परिचय (Introduction to the Indian Stock Market)

भारतीय शेअर बाजाराचा परिचय (Introduction to the Indian Stock Market)


People also ask

FireWing, Capital

शेअर मार्केट? अभ्यास

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी

शेअर मार्केट लाईव्ह

आजचे शेअर मार्केट

शेअर मार्केट ची माहिती

शेअर मार्केट न्यूज

शेअर खरेदी विक्री कसे करावे?

भारतातील शेअर मार्केटचे भविष्य काय आहे?




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.